Tuesday, Jan 23rd

Headlines:

अत्याधुनिक उपचार देणारे कोकण कार्डियॅक सेंटर सुरू

E-mail Print PDF
lo_hospital1
lo_hospital2
कित्येक वर्षापासून कोकणातील हृदयरोग रूग्णांना उपचारासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे जावे लागत असे. त्यामुळे बहुमुल्य वेळ, पैसे खर्च होत तर काहीवेळा वाटेतच पशंटच्या प्राणावर बेतले जात असे. कोकणच्या मातृभूमीतील डॉक्टरांनी सुरू केलेल्या कोकण कार्डियॅक सेंटरच्या माध्यमातून ३६५ दिवस अहोरात्र सेवा देण्याचा संकल्प करून हृदयग्रस्त रूग्णांना दिलासा दिलेला आहे. डॉ. संजय लोटलीकर व डॉ. अमेय आमोणकर यांनी हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे.
रूग्णांची सेवा या एकाच उद्देशाने डॉ. संजय लोटलीकर व डॉ. अमेय आमोणकर यांनी गुणवत्ता व किफायतशीर चार्जेस यांचा मिलाफ साधत या सेंटरची सुरुवात केलेली आहे. डॉ. अमेय आमोणकर हे इंटरर्व्हेशनल कार्डियालॉजिस्ट असून मुंबईच्या प्रसिद्ध सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमधून नामांकीत पदवी संपादन केलेली आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये कार्डियालॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये तसेच ठाण्याच्या विशेष हॉस्पिटलमध्ये त्यांनी इंटरव्हेशनल कार्डियॉलॉजीस्ट म्हणून काम केलेले आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेंशन या संस्थेने त्यांना स्पेशालिस्ट इन क्लिनिकल हायपरटेंशन हे सदस्यत्व बहाल केलेले आहे. विविध देशातील अत्याधुनिक हार्ट सेंटरमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेवून परदेशातील डॉक्टरांसमवेत काम केलेले आहे.
कोकण कार्डियॅक सेंटरमध्ये आठवड्याचे सर्व दिवस प्रायमरी इसीजीपासून अत्याधुनिक कोरोनरी अँजिओप्लास्टीपर्यंत सेवा उपलब्ध आहे. बाह्य रूग्णांकरिता  हृदयरोग चिकित्सा, २ डी इको कार्डिओग्राफी, ड्रेडमील स्टेस टेस्ट, होल्टर मॉनिटरींग, ऍम्युलेटरी बी.पी. मॉनिटरींग तसेच लहान मुलांकरिता पेडिऍट्रीक इकोकार्डिओग्राफी या सेवा दिल्या जातात. आधुनिक १० बेडचे आयसीयु (इन्वेंसीव्ह कार्डियॅक केअर युनिट) टेंपररी पेसमेकर व बलून पंप या सोयीनी सज्ज आहे
कोकण भूमितील अद्ययावत कॅथ लॅब कोकण कार्डियॅक सेंटरमध्ये असून कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पर्मनंट पेसमेकर इम्प्लांटेशन, बलून व्हॉल्व्होप्लास्टी, रिपल अँजिओप्लास्टी, कॉन्जीनीटल हार्ट डिसीजसाठी डिव्हाईस क्लोजर इत्यादी क्रिया केल्या जातात.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूण वयामध्ये हॉर्ट ऍटॅक येणे व त्यावेळी इमर्जन्सी ह्दयरोग सेवा मिळणे म्हणजे जीवनदानच. अशावेळी पामी प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इनफारक्शन सेवा मिळणे ही वैद्यकीय जगातात खात्रीची व मानाची समजली जाते. कोकण पट्ट्यात पामी ही प्रोसिजर करणारे कोकण कार्डियॅक हे एकमेव सेेंटर आहे. डॉ. आमोणकर हे सर्व प्रोसीजर रॅडीयल रूट (हातातील रक्तवाहिन्या) या पद्धतीने काम करीत असल्यामुळे कमीत कमी गुंतागुंतीत ही प्रोसीजर पार पडते व पेशंटला डिसचार्ज
मिळतो.
गेली अनेक वर्षे कोकणवासियांची सेवा करणारे डॉ. संजय लोटलीकर यांचे रत्नागिरीत अत्याधुनिक पद्धतीचे हार्ट सेंटर उभे करण्याचे स्वप्न होते. ते आता कोकण काडिर्ंयल सेंटरच्या रूपाने साकार झाले असून आगामी काळात या ठिकाणी बायपाससारख्या सर्जरी सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला डॉ. संजय लोटलीकर, डॉ.अमेय आमोणकर, नाडकर्णी, दिलीप पाखरे आदीजण उपस्थित
होते.