Tuesday, Jan 23rd

Headlines:

मासिक राशिभविष्य - नोव्हेंबर २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankar
mesh
rishabh
mithun
cancer
lion
kanya
tul
ruchik
dhanu
makar
kumbh
meen
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

किर्ती मिळेल
मेष ः

या महिन्यात साक्षात गुरु आपले भाग्य उजळवायला आला आहे. गुरुचे आनंदाने स्वागत करावे. यश, किर्ती आणि समृध्दी आपल्या दारात उभे आहेत. पूर्वपुण्याई फळाला येईल. आपले कष्ट, जिद्द, सच्चाई व ईश्‍वरी उपासना यांचे खर्‍या अर्थाने चीज होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा वाढून किर्ती मिळेल. सर्व तर्‍हेची सुखं व वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने होतील. आर्थिक आवक व्यापारी वर्गाला अपेक्षित होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

काळजी घ्यावी
वृषभ ः

प्रतिकूल ग्रहमानात नवीन जबाबदार्‍या व आर्थिक व्यवहार लांबणीवर टाकावेत. घरातील वाद वाढवू नयेत. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेेचे आहे. मित्र व नातेवाईक यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. तरी शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे. शेतकरी बंधुंनी जनावरांपासून सावध रहावे. या सर्वांवर मात करणेसाठी केतुमहाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. सौख्य व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. बुध्दीकारक बुध योग्य मार्ग काढून स्वास्थ्य लाभून देईल. प्रत्येक बाबतीत गुप्तता पाळणे गरजेचे आहे.

शनिकृपा होईल
मिथुन ः

या महात आपणावर शनि महाराजांची कृपा झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. तब्बेत उत्तम राहील. आपल्या सुखात वाढ होऊन धनलाभ होऊन मित्र सहकार्य उत्तम लाभेल. उपासनेवर भर देणे गरजेचे आहे. राहू मात्र सुखात अडथळे आणणारा आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद मिळणेची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी मिळेल. नवीन योजना सफल होतील. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. नवीन वास्तू खरेदी होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

चीज होईल
कर्क ः

आपले कर्तृत्व, बुध्दीमत्ता, निरपेक्ष बुध्दीची सेवा लवकरच फळाला येईल. अवघड कार्यात यश लाभून किर्ती मिळेल. शनि महाराज घरच्या व्यक्तींची काळजी घेणेचा सल्ला देत आहेत. धाडसाने पुढे जाल. स्वतंत्र व्यवसायात यश लाभेल. जमीन जुमल्याचे व्यवहारातून यश लाभेल. अचानक धनलाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. आपले प्रभावी व्यक्तिमत्व उजळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी व कारखानदार यांचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडतील. सर्व प्रकारची सौख्य लाभून स्वास्थ्य लाभेल. काळ अत्यंत सुखात व चैनीत जाईल. घरगुती वाद वेळीच मिटवावेत. आनंद संयमाने द्विगुणित करावा.

नियंत्रण हवे
सिंह ः

पैसा आला तरी तो टिकवणे कठीण असते. सर्वच दिवस सारखे नसतात. भागिदारीत व्यवसाय त्रासदायक होईल. अचानक खर्च उभे राहतील. मनाला मुरड घालून विचारपूर्वक महत्वाचे निर्णय घेेणे उचित होईल. खाणे-पिणे बंधनात असावे अन्यथा घशाला त्रास होण्याची शक्यता आहे. घरगुती वाद विकोपाला नेऊ नयेत. मुलाबाळांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपला व परका माणूस ओळखून व्यवहार करणे इष्ट होईल. स्थलांतर दर्शविते. शनिमहाराज अडचणी निर्माण करणारे आहेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. शत्रूपासून सावध रहावे. आर्थिक आवक वाढेल.

तब्बेत सांभाळा
कन्या ः

या महिन्यात अनिष्ट ग्रह आपणाला तब्बेत सांभाळण्याचा सल्ला देत आहेत. मन शांत ठेवून व बंधनात राहून कार्यात यश मिळवावे हेच योग्य होईल. उष्णतेच्या विकारापासून सावध रहावे. शुक्र वस्त्रलाभ व धनलाभ करुन देईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. धाडसानेच पुढे जाणे योग्य होईल. गुरु महाराज मनात विचारांचे काहूर माजवतील. तरी मानसिक स्वास्थ्य बिघडवू नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरावे म्हणजे गैरसमज होणार नाही. मोह टाळावा. तूर्तास विवाहइच्छुंनी विवाह योग दूर ठेवणे लाभाचे होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

परिक्षेचा काळ
तुळ ः

या महिन्यातील प्रतिकूल ग्रहमान आणि परीक्षा घेणारे आहेत, तेव्हा धाडस जपून करणे गरजेेचे आहे. वाहन व वीज यापासून सावध रहावे. आर्थिक व्यवहार शक्यतो लांबणीवर टाकावेत. शब्दाला धार नसली तरी आधार असावा. स्पष्टवक्तेपणा त्रासदायक होईल. मात्र गुरुकृपेने सुख प्राप्त होऊन अनेक महत्वाची कामे मार्गी लागतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी कामात व आर्थिक व्यवहारात गुप्तता ठेवणे योग्य होईल. मोह टाळावा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

इच्छापूर्ति होईल
वृश्‍चिक ः

धाडसी, पराक्रमी मंगळ, हौशी शुक्र आणि अर्थदाता शनि हे बलाढ्य ग्रह आपल्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा इच्छापूर्ति ही होणारच. व्यवसाय व नोकरीत अपेक्षित बदल दर्शवितो. तब्बेत उत्तम राहील. राहू कृपेने ऐश्‍वर्य व सुख लाभतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. राजकीय व शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. यश व किर्ती लाभेल. जमीन खरेदी योग आहेत. स्वतंत्र व्यवसायात वाढ होईल. मात्र मित्र व नातेवाईक यांच्याशी जपून व सलोख्यानेच वागावे. कारखानदार, उद्योगपती व व्यापारी यांचे व्यवसायात बदल व वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

व्यक्तिमत्व उजळेल
धनु ः

शनिच्या साडेसातीमुळे आपण अनेक संकटांना तोंड देत आहात. आर्थिक व शारीरिक समस्या, घरगुती अडचणी अशा त्रासातून आपणाला आता सुटका होणार आहे. गुरुकृपेने आपणावर आता सुखद प्रसंग येणार आहेत. सौभाग्य सिध्दी व ऐश्‍वर्य आपणाला लाभणार आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. आर्थिक समस्या सुटून आवक वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात आनंदीआनंद होईल. व्यक्तिमत्व उजळेल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होईल. चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह वाढेल. सुख व स्वास्थ्य लाभेल.

आर्थिक लाभ होतील
मकर ः

अर्थदाता शनि आपणावर कृपा करणार असून, आपली आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे. नवीन व्यवसायात भरघोस यश लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढून यश व किर्ती लाभेल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. आपल्या सुखात वाढ होणार आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा वाढेल. लोकोपयोगी कार्यात यश लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील. त्या दीर्घकाळ टिकतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन वास्तू खरेदी कराल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. मात्र तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. काळ सुखात जाईल.

अपेक्षापूर्ति होईल
कुंभ ः

आपले कष्ट, जिद्द, चिकाटी व निरपेक्ष बुध्दीची सेवा या सर्वांचं चीज होऊन मनोकामना पूर्ण होणार आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन मित्रांशी सलगी होईल. आपल्या कर्तृृृत्वाचा व कौशल्याचा हेवा वाटावा अशी कामगिरी हातून होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढून अवघड कार्यात यश मिळेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा दर्जा उंचावेल व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होऊन नवीन योजना सफल होतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरात उत्तम घटना घडतील. वाहनापासून जपून रहावे. आर्थिक व्यवहार थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच करावेत. काळ सुखात जाईल.

घाई नको
मीन ः

नशिबात असल्याशिवाय व योग्य वेळ आल्याशिवाय काहीही मिळत नाही, अशी आपली स्थिती झाली आहे. सध्याचे ग्रहमान प्रतिकूल असून, दैव आणि देव आपणाला साथ देत नाहीत. तरी घाई न करणे योग्य होईल. जे आपलं आहे ते आपणाला मिळणारच आहे. त्यासाठी जास्त विचार करु नये. घरगुती समस्यांना वेळीच आवर घालावा. मानसिक ताणतणाव वाढवु नये. लवकरच आपला भाग्योदय होणार आहे. तरी सध्या काळोखात असलात तरी पुढे उजेड आहे हे ध्यानात ठेवावे. संकटांना धाडसाने सामोरे जायचे असते. यश आपलेच आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणुक करावी.