Tuesday, Jan 23rd

Headlines:

मासिक राशिभविष्य - सप्टेंबर २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankar
mesh
rishabh
mithun
cancer
lion
kanya
tul
ruchik
dhanu
makar
kumbh
meen
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

उत्कर्ष होईल
मेष ः

हा महिना आपला आनंद व उत्कर्ष द्विगुणित करणारा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होऊन स्वास्थ्य लाभेल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. तसेच वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. मुलाबाळांचे बाबतीत उत्तम घटना घडतील. गुरुकृपा झाल्याने अनेक जुनी अपुरी कामे मार्गी लागतील. महिलांना सुख व शांती लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव प्रतिष्ठित व्यक्तींकडून होईल. नोकरदारांना उच्चपद संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना परदेशागमन योग संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धाडसाने सर्व मिळेल
वृषभ ः

अखेर पूर्ण आत्मविश्‍वासाने धाडस केल्यास यश मिळतेच याची प्रचिती आपणाला येईल. सौख्य व ऐश्‍वर्य लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. उत्तम घटनांचा व यश देणारा काळ आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. घरातील वाद वेळीच मिटवणे योग्य होईल. मुलाबाळांच्या गरजा वेळीच भागविणेत याव्यात. जमिनजुमला खरेदी योग आहे. केतु आपणाला सौख्य व ऐश्‍वर्य प्रदान करणारा आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

सुखात वाढ होईल
मिथुन ः

साक्षात शनि महाराजांची कृपा झाल्यावर काय कमी पडणार? पैसा, प्रसिध्दी, मानमुराद, कार्याचं चीज या सर्व गोष्टी शनिकृपेने आपणाला लाभणार आहेत. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मनोकामना पूर्ण होतील. शत्रु मित्र बनतील. नातेवाईक व मित्रमंडळींची उत्तम साथ लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. जुनी येणी वसूल होतील. परदेशागमन योग येईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आर्थिक गुंतवणूक लाभदायक होईल. काळ सुखात जाईल.

गुरुकृपा होईल
कर्क ः

गुरुकृपा झाली की पांगळादेखील पर्वत चढतो व मुका उत्तम वक्ता होतो. तिथे तुमचं आमचं काय? सर्व बाजुंनी उत्कर्ष व भरभराटीचा काळ आहे. इच्छापूर्ति होईल. धाडसाने, कर्तृत्वाने व कुशाग्र बुध्दिमत्तेेने अनेक क्षेत्र पादाक्रांत कराल. प्रतिष्ठितांकडून कार्याचा गौरव होईल. अनेक प्रकारची सुखं लाभतील. आर्थिक आवक अपेक्षित होईल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा वाढेल. घरगुती समस्या कुशलतेने सोडवाव्यात. माघार घेऊन पुढे जाणे योग्य होईल. शब्दाला धार नसावी, आधार असावा. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित पैसा मिळेल.

सावधानता बाळगावी
सिंह ः

राहू, केतू, शनि व मंगळ यासारखे बलाढ्य ग्रह आपल्या बुध्दिमत्तेची व कार्याची कसोटी पाहणारे आहेत. तेव्हा पूर्ण विचाराअंती व थोरामोठ्यांच्या सल्ल्याने महत्वाचे निर्णय घेणे लाभदायक होईल. तथापि या सर्वांवर मात करणेसाठी गुरुमहाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. उष्णतेच्या विकारापासून व वाहनांपासून सावध रहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गुरुकृपेने सर्व ठीक होईल.

आर्थिक भरभराट होईल
कन्या ः

या महिन्यात शनिकृपेने आपली आर्थिक भरभराट होणार आहे. नविन योजना हाती घ्याल. जुन्या इस्टेटीचे वाद संपुष्टात येतील. अनेक क्षेत्रात आघाडीवर रहाल. व्याप वाढून दगदग खुप होईल. नवीन वास्तू खरेदी योग येईल. मात्र ताणतणाव वाढवू नये. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी मिळेल. विवाहइच्छुंचे अपेक्षित विवाह होतील. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल. इच्छापूर्ति होऊन समाधान लाभेल.

व्यक्तिमत्व उजळेल
तुळ ः

अवघड कामात यश मिळाल्याने आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. नवीन वास्तू खरेदी योग आहे. कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजुने लागतील. देव आणि दैव आपल्या बाजुने आहे. तेव्हा आपण या महिन्यात उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ होणार आहात. यश संयमाने पचवायचे असते हे ध्यानात हवे. शनि महाराज हातात आलेला पैसा टिकू देणे अवघड आहे. दूरचे प्रवास योग येतील. अनेक प्रकारची सुख प्राप्त होतील. घरात शांतता राखणे गरजेचे आहे. विवाहइच्छुंचे विवाह होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नोकरदारांना उच्चपद संभवते. काळ सुख, शांती व समृध्दी देणारा आहे.

सौख्य लाभेल
वृश्‍चिक ः

आपले कष्ट, जिद्द व निरपेक्ष बुध्दीची सेवा याचं आपणाला फळ या महात मिळणार आहे. अर्थप्राप्ती अपेक्षित होईल. नवीन योजना यशस्वी होतील. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. राहु सर्व प्रकारची सुखं देणारा आहे, तेव्हा धाडसाने पुढे जावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभून प्रसिध्दी मिळेल. एकंदरीत सर्व बाजूने भरभराट होणारा काळ आहे. चैनीच्या वस्तू खरेदी होतील. काळ आपल्या बाजुने आहे. त्याचा वेळीच फायदा घ्यावा. व्यापारी वर्गातील व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

भाग्य उजळेल
धनु ः

आपली सच्चाई, ईश्‍वरी उपासना व संयम यामुळे आपले भाग्य उजळणार आहे. गुरु, बुधासारखे बुध्दिकारक व किर्ती देणारे ग्रह आपणाला उत्तम साथ देणारे असून, आपले भाग्य उजळणार आहे. मात्र तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. विवाहइच्छुंनी तूर्तास विवाह करणेचा विचार दूर सारावा. शनिची साडेसाती चालू आहे तेव्हा विचारपूर्वक योजना आखाव्यात. नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. शासकीय सेवेतील व्यक्तींना कामात गुप्तता राखावी व वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. जास्त दगदग करु नये. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ स्वास्थ्य मिळवून देणारा आहे.

किर्ती मिळेल
मकर ः

सर्वांना समान न्याय देणारे व सुखी करणारे आपण आहात, मग ते नातेवाईक असोत अगर मित्र असोत. यामुळे आपल्या कार्यक्षेत्र वाढत गेले असून, आपणाला यश व किर्ती लाभणार आहे. सच्चाई आणि मेहनत व ईश्‍वरी सेवा फळाला येणार आहे. अपेक्षित पैसा व यश यामुळे ऐश्‍वर्य व सुखशांती आपणाला लाभणार आहे. हे सर्व करताना तब्बेत सांभाळणे गरजेचे आहे. नवीन वास्तू खरेदी योग आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. संयमाने व विचारपूर्वक निर्णय घेणे उचित होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

धीर धरा
कुंभ ः

शिजलं तरी निवेपर्यंत थांबावे लागतेच. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणार आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. आपल्यावरील अन्याय दूर होऊन आपली अपेक्षापूर्ति होणार आहे. घरात आनंदीआनंद होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. डोळे व उदर यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक आवक अपेक्षित होईल. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

कसोटी आहे
मीन ः

आपले कर्तृत्व व दातृत्व जरी महान असले तरी बलाढ्य ग्रह आपल्या कौशल्याची व बुध्दिमत्तेची कसोटी घेणारे आहेत. तेव्हा नशिबात असल्याशिवाय व वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही हे खरं. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी काळजीपूर्वक व विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. तूर्तास विवाह योग पुढे ढकलणे योग्य होईल. तब्बेतीची काळजी घ्यावी. ताणतणाव मनावर ठेवू नये. सर्व ठीक होईल, पण शांत रहाणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला आर्थिक आवक अपेक्षित होईल.