Monday, Jan 22nd

Headlines:

नामगंगा-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

E-mail Print PDF
पती-पत्नीने मिळते-जुळते घेऊन प्रपंच आनंदात करावा
एक सुशिक्षित जोडपे होते. दोघेही एकाच कॉलेजात प्रोफेसर होते. दोघांमध्ये मतभेद होऊन नेहमी वाद विकोपास जाई. काही दिवसांनी नवर्‍याची बदली बाहेरगावी झाली. दोघेही नव्या ठिकाणी गेले. काही दिवस बरे गेले पण एके दिवशी वाद चिघळला. नवर्‍याचा तोल सुटला व त्याने पत्नीच्या थोबाडीत मारली. बाईला ते सहन झाले नाही. त्याच दिवशी रात्रीच्या गाडीने ती माहेरी निघून गेली. यावर काही दिवस लोटले व यजमानांना मुदतीचा ताप आला आहे असे तिला कळले. काय करावे याबद्दल तिला निर्णय घेता येईना. म्हणून ती श्रीमहाराजांना भेटली. श्रीमहाराज म्हणाले, समजा एक दोन चाकांचे वाहन आहे, त्यापैकी एक चाक एका दिशेने व दुसरे चाक दुसर्‍या दिशेने चालले तर त्या वाहनाची दुर्दशा होते. पुरूष आणि स्त्री यामध्ये भेद आहे हे उघड आहे पण जगाचा खेळ नीट चालण्यासाठी तो अवश्य असतो. पुरूषामध्ये शौर्य व औदार्य तर स्त्रिमध्ये सहनशीलता व अनन्य शरणागति हे गुण जात्याच ठेवलेले आहेत. प्रपंचामधील प्रसंगामध्ये पड खाणे हे सहनशिलतेला साजेसेच असते. तसे केल्याने मनाचा मोठेपणा दिसेल. जग हे देवाने निर्माण केलेले मोठे नाटकच आहे. त्यात ज्याच्याकडे जी भूमिका येते ती त्याने उत्तम प्रकारे वठवणे हेच त्याचे कर्तव्य असते. एखाद्यास हलकी भूमिका केल्याइतके श्रेय मिळते. पुत्ररत्न होवून मातृपदाचा मान मिळण्याचा अधिकार तुमचाच आहे. तो जयमानांना कदापि मिळणार नाही. तेव्हा आपल्या हक्कांचा आग्रह डोक्यातून काढून टाकावा. दोघांनी एकमेकांच्या प्रेमात राहण्यातच खरे सुख  व समाधान आहे. मग मी आता काय करू? असे बाईने विचारल्यावर श्रीमहाराज म्हणाले, यानंतरचया पहिल्या गाडीने यजमानांच्याकडे जा. पूर्वी काही झालेच नाही अशा भावनेने त्यांची सुश्रुषा करा.