Tuesday, Jan 23rd

Headlines:

मासिक राशिभविष्य - ऑगस्ट २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankar
mesh
rishabh
mithun
cancer
lion
kanya
tul
ruchik
dhanu
makar
kumbh
meen
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

गुरुकृपा होईल
मेष ः

जन्मोजन्मीच्या पुण्याईने गुरुकृपा होत असते. गुरुकृपा झाली की माणूस अंधकारातून ज्ञानाच्या व सुबत्तेच्या प्रकाशझोतात येतोच. तेव्हा या महिन्यात आपल्या अनेक अवघड गोष्टींना चालना मिळेल व सुख, समृध्दी लाभेल. नवीन वास्तू होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. महिलावर्गात आनंदी वातावरण राहील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी व उच्चपद लाभेल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. सुशिक्षित बेकारांना संधी उपलब्ध होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

सौख्य लाभेल
वृषभ ः
आपले कष्ट व जिद्द यांना योग्य तो न्याय मिळून स्वास्थ्य लाभेल. सर्व प्रकारचे ऐश्‍वर्य लाभेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुखात वाढ होईल. मित्र व नातेवाईक यांचे सहकार्य उत्तम लाभेल. धाडसाने पुढे जाऊन यश पदरी पाडून घ्यावे. घरातील वृध्द व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ संभवतो. भागिदारीत व्यवसाय करु नये. आर्थिक आवक अपेक्षित होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. जबाबदार्‍या स्विकारु नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

प्रतिष्ठा वाढेल
मिथुन ः

कष्ट, धाडस, कर्तृत्व यांना बुध्दिमत्तेची झालर असली म्हणजे अवघड कार्यात यश मिळून प्रतिष्ठा वाढतेच. अपेक्षित आर्थिक प्राप्ती होईल. घरात शांतता नांदेल असे पहावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. स्वतंत्र व्यवसायात वाढ होऊन चिंता दूर होतील. आर्थिक व्यवहार जपून करावेत. जमिनजुमला खरेदी योग आहेत. गुरु कार्यात विघ्न निर्माण करणारा आहे. गुप्त गोष्टीत सावधानता बाळगावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

प्रभावी नेतृत्व होईल
कर्क ः

शेवटी कुशाग्र बुध्दीमत्ता, कामाचा योग्य वेळी उरक व निरपेक्ष बुध्दीची सेवा यांचे उत्तम फळ मिळतेच याची प्रचिती आपणाला लवकरच येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मुलाबाळांशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना उच्चपद संभवते. धाडसाने यश प्राप्त करुन घ्याल. नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल. आर्थिक आवक वाढेल. ताणतणाव दूर होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडतील. काळ सुखात जाईल.

गमन होईल
सिंह ः
या महात दुरचे प्रवास सुखकर होतील. परदेशागमनही होईल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  नवीन जबाबदार्‍या स्विकारु नयेत. गुरुकृपेने सारं काही ठिक होईल. शत्रू मित्र बनतील. गैरसमज दूर होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. खाण्यापिण्याचे बाबतीत बंधनात रहाणे योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य व हितकारक होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. जबाबदार्‍या वाढतील. विचाराने महत्वाचे निर्णय घ्यावेत.

आवक वाढेल
कन्या ः

या महापासून आर्थिक आवक वाढणार आहे. जमिन खरेदी योग आहे. कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. धनलाभ होऊन प्रतिष्ठा वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह होतील. महिलांना वस्त्रलाभ होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी व आर्थिक आवक वाढेल. विचारपूर्वक जबाबदारी घेेणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण हवे. नवीन व्यवसाय सुरु करण्यास काळ उत्तम आहे. तब्बेतीची काळजी घ्यावी. वाहन सावकाश चालवावे. आनंद संयमाने द्विगुणित करावा. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ प्रगतीकारक आहे.

किर्ती मिळेल
तुळ ः

आपल्या धाडसी कार्याचं कौतुक प्रतिष्ठित व्यक्तींकडून होऊन आपणाला प्रसिध्दी व किर्ती मिळणार आहे. धनलाभ, मानलाभ होऊन स्वास्थ्य मिळेल. अनेक उत्तम घटना घडतील. नवीन वास्तू खरेदीचा योग आहे. आर्थिक आवक अपेक्षित राहील. नवीन योजना हाती घेण्यास उत्तम काळ आहे. अनेक प्रकारची सुख व धनलाभ होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानमुराद व उच्चपद मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

तब्बेत सांभाळा
वृश्‍चिक ः

अति पैसा रोगराई व संकट घेऊन येतो असं म्हणतात. तेव्हा अपेक्षित अर्थप्राप्ती झाली तरी दानत मोठी असावी हे योग्य. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घेणे जरुर आहे. फक्त राहू आपणाला सौख्य व ऐश्‍वर्य देणारा आहे. मिळणे सोपे, पण टिकवणेच कठीण असते. संयम राखावा. मानसिक दौर्बल्य झटकून टाकावे. आत्मविश्‍वास व श्रध्दास्थान वाढवावे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन संधीचा वेळीच लाभ घ्यावा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

समाधानी व्हाल
धनु ः

हा महिना आपणाला स्वास्थ्य व समाधान मिळवून देणारा आहे. आपल्या कष्टाचे व सच्चाईचे फळ अपेक्षित मिळेल. सुखं प्राप्त होतील. विवाहइच्छुचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी लाभेल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी येईल. स्वप्न, दृष्टांत  खरे होतील. जमीन जुमल्याचे निकाल आपल्या बाजूने लागतील. दुरचे प्रवास यशस्वी होतील. शनिची साडेसाती असल्याने नवीन जबाबदार्‍या विचारपूर्वक स्विकाराव्यात. वैरी निर्माण होणार नाहीत याची बोलताना काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवहार करु नयेत.

सौख्य व लाभ होतील
मकर ः

या महिन्यात अनेक प्रकारची सौख्य व अपेक्षित लाभ होणार आहेत. जुनी येणी वसुल होतील. प्रवासात मौल्यवान वस्तू जपणे आवश्यक आहे. डोळे व पोट यांची जास्त काळजी घ्यावी. घरातील वृध्द व्यक्तीची काळजी घ्यावी. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्कर्ष व मनोकामना पूर्ण करणारा काळ आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. वस्त्रलाभ होईल. घरात उत्तम घटना घडून सुख व स्वास्थ्य लाभेल. हा काळ प्रगतीकारक असून, स्वास्थ्य देणारा आहे. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होईल व अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.

अपेक्षापूर्ति होईल
कुंभ ः

अखेर सच्चाईला न्याय मिळतोच हेच खरे. याची प्रचिती आपणाला या महिन्यात येईल. विझतानाचा दिवा मोठा होतो, तेव्हा शत्रूंवर मात करुन पुढे जाल व ध्येयपूर्ति होईल याची खात्री बाळगावी. मंगल कार्यासाठीचे प्रवास यशस्वी होतील. घरात अपेक्षित उत्तम घटना घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तब्बेतीची काळजी घ्यावी. बंधनात राहणे योग्य होईल. गुरुकृपेने व ग्रहराज रवि कृपेने या सर्वांवर मात करुन व्यक्तिमत्व उजळाल. आर्थिक लाभ होऊन स्वास्थ्य लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते.

सावधगिरी बाळगावी
मीन ः

काळोखातून जाताना जसं काळजीपूर्वक जावे लागते तसेच प्रतिकूल ग्रहमानात प्रत्येक गोष्ट निरखुन पारखून व विचारपूर्वक करावी लागते. हा महिना आपल्या बुध्दिमत्तेची व कष्टाची पारख करणारा आहे. घरातील वृध्द व्यक्तीची काळजी घेणे जरुर आहे. विवाहइच्छुंनी विचारपूर्वक होकार द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी संपादन करणे गरजेचे आहे. बुध्दीकारक बुध या सर्वातून मार्ग काढून यश देणारा आहे. आर्थिक गुंतवणूक शक्यतो टाळावी.