Tuesday, Jan 23rd

Headlines:

मासिक राशिभविष्य - जून २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankar
mesh
rishabh
mithun
cancer
lion
kanya
tul
ruchik
dhanu
makar
kumbh
meen
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
मेष ः

बुध्दिकारक बुध आपले व्यक्तिमत्व उजळवून ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणार आहेत. कवि, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी लाभून आर्थिक आवक वाढेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात उत्साह वाढेल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक आवक वाढेल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होईल. शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध रहावे. अध्यात्मिक उन्नती होईल. एकांतवास सुखावह होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल.

सौख्य लाभेल
वृषभ ः

या महात आपणाला अनेक प्रकारची सुखं लाभणार आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आनंददायक घटना घडतील. महत्वाचे व्यवहारात गुप्तता राखावी. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरगुती वाद वाढवू नयेत. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी लाभेल. कलाकारांना यश व किर्ती लाभून आर्थिक आवक वाढेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून नवीन लोकहितकारक योजना राबवल्या जाऊन प्रसिध्दी मिळेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना मानाचे स्थान लाभेल. अनेकांना परदेशागमनाचे योग येतील. काळ सुखात जाईल.

गुरुकृपा होईल
मिथुन ः

गुरुकृपा झाल्यावर अशक्य ते शक्य होईल. मानमुराद, प्रतिष्ठा व अपेक्षित अर्थप्राप्ती होतेच. या सप्ताहात आपणाला याची प्रचिती येईल. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. उष्णतेच्या विकारांपासून सावधानता बाळगावी. भाऊबंदक्या वाढवू नयेत. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. घरात उत्तम घटना घडून काळ सुखात जाईल.

व्यक्तिमत्व उजळेल
कर्क ः

या महिन्यात आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढून आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मान, अचानक धनलाभ व अनेक उत्तम घटना घडून मानसिक स्वास्थ्य लाभेल. कोर्टकचेरीचे निर्णय आपल्या बाजूने लागतील. नवीन वास्तू खरेदी योग येईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. सुख व समृध्दी लाभेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन मन प्रसन्न राहील. अनेकांना परदेशागमन योग संभवतो.

ताबा हवा
सिंह ः

आर्थिक बाबींवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. अचानक खर्च उभे राहण्याची शक्यता आहे. दगदग करु नये. तब्ब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाह इच्छुकांनी विचारपूर्वक विवाहाचा निर्णय घेणे उचित होईल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. या सर्वांवर मात करण्यास ग्रहराज रवि व धाडसी मंगळ उत्तम सहकार्य करणार आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. बंधनात राहणे योग्य होईल. ग्रहमान मिश्र स्वरुपाचे आहे, तेव्हा घाई नको. सावधानता बाळगणे योग्य होईल.

झाले मोकळे आकाश
कन्या ः

आपण शनिमहाराजांच्या शनिच्या साडेसातीतून कष्टप्रद व धाडसाने मोकळे झाले आहात. प्रगतीपथाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात. मागील काही घटना हृदयपटलावरुन काढून टाका व नवीन योजना हाती घेऊन भरघोस यशस्वी होणार आहात. देव आणि दैव आपणावर खूष व वरदहस्त ठेवून आहे. तेव्हा यश व उत्कर्ष होणारच आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. नवीन वास्तूत प्रवेश होईल. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिलावर्गात आनंद निर्माण होईल.

राखून ठेवावे
तुळ ः

मिळालेला पैसा, मान व किर्ती हे जतन करुन ठेवणे योग्य होईल. बलाढ्य ग्रह आपणासमोर अचानक नवे खर्च उभे करण्याची शक्यता आहे. बुध्दिकारक बुध अचानक धनलाभ करुन देणारा आहे. अनेक प्रकारची सुखं लाभतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. नवीन व्यवसायात विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. मंगळ महाराज कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील व मनोदौर्बल्य येण्याची शक्यता आहे. दुरचे प्रवासयोग येतील. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. काळजी वेळीच घेतली तर काळजी करावी लागत नाही.

सौख्य लाभेल
वृश्‍चिक ः
गुरुकृपेने जीवनात आनंद व उत्साह वाढून यश, किर्ती लाभेल. अनेक उत्तम व अपेक्षित घटनांचा काळ आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना प्रसिध्दी मिळून अपेक्षित आर्थिक आवक होईल. मात्र पैसा टिकवणे कठीण होणार आहे तेव्हा वेळीच सावधानता बाळगावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरगुती कलह वाढवू नयेत. या महिन्यात अनेक प्रकारची सुखं लाभून काळ सुखात जाईल. वाहनांपासून सावध रहावे. दुरचे प्रवास तूर्तास लांबणीवर टाकावेत.

धीर धरा
धनु ः

बहुतांशी बलाढ्य ग्रह आपली परीक्षा घेणारे आहेत. त्यात शनिमहाराजांची अवकृपा तेव्हा जे काही आयुष्याचे महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, ते थोरामोठ्यांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य व लाभदायक होईल. आर्थिक आवक घटेल. काटकसरीत रहावे. विवाहइच्छुंनी विवाह सावधानतेनेच व माहिती नीट खात्रीशीर असल्याशिवाय करु नयेत. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना गुप्तता व सावधानता बाळगणे योग्य होईल. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. शक्यतो सर्वांशी मिळतजुळत घेऊन रहावे हेच योग्य. तूर्तास घाई नको.

यश, किर्ती मिळेल
मकर ः

आपला राशिस्वामी अर्थदाता शनि आहे. आपणावर गुरु, शनि व राहू- केतू यांची मेहरनजर आहे. तेव्हा आपण आपल्या प्रगतीचा वेग वाढवणार आहात. अनेक कठीण कार्यात यश संपादन करुन आपला सामाजिक दर्जा उंचावणार आहे. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे भाग्य उजळणार आहे. अचानक नवीन वास्तू खरेदी योग येईल. आर्थिक आवक वाढेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारी वर्गाचे व्यवसायात वाढ होऊन अर्थप्राप्ती अपेक्षित होईल. काळ सुखात जाईल.

बदल नक्की होईल
कुंभ ः

आपणावर देवाने अन्याय केला असे वाटते आहे, पण ते चुकीचे आहे. लवकरच देव आपणाला भरघोस न्याय देणार आहे. मानसिक तणाव उगाच वाढवू देऊ नये. जे दिसत नाही, पण भासमान्त असल्याने आहे असे जाणवते तसंच आपलं आहे. आपल्या शब्दाला वजन आहे. सच्चाई व दैवी उपासना आपणाला यश दिल्याखेरीज राहणार नाही. गुरुकृपा सर्व ठीक करणार आहे. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मित्रांचे सहकार्य उत्तम लाभेल. शांत राहूनच यश पदरी पडणार आहे याची खात्री बाळगा. सर्व ठीक होईल.

ताण दूर करावा
मीन ः

ताणतणावामुळेच अनेक समस्या व आजार निर्माण होत असतात. तरी तो दूर करावा. समस्या या कायम राहण्यासाठी येत नाहीत, प्रत्येक कोड्याला व आजाराला उत्तर आहेच, मग काळजी कां करायची. ती घ्यायची म्हणजे काम होत नाही. आपणावर गुरुकृपा झाली आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. घरात उत्तम घटना घडतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरात उत्तम घटना घडून आनंदीआनंद राहील.