Monday, Jan 22nd

Headlines:

‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ कोकणातील कलाकारांचा ’’रत्नागिरी टायगर्स

E-mail Print PDF
ratnagiri_tigers
ratnagiri_tigers1
क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जणू जीव की प्राण.. कलाकारमंडळीसुद्धा त्याला अपवाद नाही, मात्र आपल्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांना क्रिकेटची आवड जपायला वेळ मिळतोच असं नाही, नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र कलानिधीचे संस्थापक श्री नितेश राणे आणि सचिव श्री सुशांत शेलारयांनी एकत्र येत ‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वी करून दाखवलं. आता ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसर्‍या पर्वाची घोषणा करत पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाला क्रिकेटच्या मैदानात उतरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एमबीसीएलच्या माध्यमातून कलाकारांचे दहा संघ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत.
‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसर्‍या पर्वाची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे, सुशांत शेलार आणि मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’चे दुसरं पर्व ८ ते १० मे दरम्यान पाचगणी येथे रंगणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सर्व संघांच्या शिलेदारांचे स्वागत करत दुसरं पर्व आपणही एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं.कोकणातील सिद्धार्थ जाधव, अतुल तोडणकर, फैसल महाडीक, तेजस नेरुरकर, मनीषा केळकर, शिवानी सुर्वे, इम्रान महाडीक, सुमित कोमुरलेकर, वरद, नुपूर धुदावडेकर, देवेंद्र शेलार, अमित समेळ आणि वृषाली चव्हाण या कलाकारांची तगडी फौज असलेला रत्नागिरी टायगर्स हा संघ या एमबीसीएलमधून पाचगणी येथे धडाकेबाज खेळी खेळणार आहे.
‘मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’मध्ये ‘रत्नागिरी टायगर्स’, ‘शिलेदार ठाणे’, ‘कोहिनूर नागपूर’, ‘डॅशिंग मुंबई’, ‘शूर कोल्हापूर’, ‘मस्त पुणे’, ‘क्लासिक नाशिक’, ’फटाका औरंगाबाद’, ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ हे दहा संघ सहभागी होणार आहेत. चौकार-षट्कारांची आतषबाजी करायला कलाकारमंडळीसुद्धा सज्ज झाली आहेत. ’मराठी ’बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसर्‍या सीझनची धमाल झी टॉकीज वर पाहता येणार आहे.