Tuesday, Jan 23rd

Headlines:

मासिक राशिभविष्य - मे २०१५

E-mail Print PDF
ramesh-mavalankar
mesh
rishabh
mithun
cancer
lion
kanya
tul
ruchik
dhanu
makar
kumbh
meen
रमेश बा. मावळंकर, ज्योतिषाचार्य, रत्नागिरी, मोबा. ९८६०८८६९९३

धनलाभ होईल
मेष ः

हा महिना आपली आर्थिक भरभराट करणारा आहे. गुरुकृपा व आपले कष्ट यांचं चीज होऊन अनेक उत्तम घटना घडतील. मात्र शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरणे योग्य होईल अन्यथा तापदायक होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरु करु नये. मित्र व नातेवाईक यांच्याशी मिळतजुळत घेणे आवश्यक आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेच योग्य होईल. आर्थिक आवक अपेक्षित होईल. मनोदौर्बल्य झटकून आत्मविश्‍वास  बाळगावा. सर्व बाबतीत यशी व्हाल.

जिद्द बाळगा
वृषभ ः

अवघड कार्यात यश संपादन करायचे असेल तर जिद्द व आत्मविश्‍वास असणे आवश्यक आहे. धाडसी मंगळ व ग्रहराज रवि आपली प्रतिष्ठा वाढविणारे आहेत. अचानक धनलाभ संभवतो. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या जबाबदार्‍या वाढतील. नवीन योजना यशस्वी होतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. घरगुती वादविवाद वाढवू नयेत. नवीन वास्तू खरेदी योग येईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मानमुराद वाढून प्रतिष्ठा मिळेल.

उत्तम काळ
मिथुन ः

अखेर बुध्दिमत्ता, कर्तृत्व हे कुठे लपून बसू शकत नाही. त्यांचे चीज होणारच, याची प्रचिती आपणाला या महात येईल. दैव व देव आपणावर खुष आहेत, तेव्हा पैसा व प्रसिध्दी, मानमुराद या गोष्टी लाभतीलच. नवीन योजना हाती घेऊन यश संपादन कराल. मात्र स्वाभिमान असावा पण गर्व नसावा हे महत्वाचे आहे. नवीन वास्तू खरेदी योग येईल. राजकीय, शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. कलाकारांना व सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी लाभेल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वाढ होऊन काळ सुखात जाईल.

कर्तृत्व उजळेल
कर्क ः

कुशाग्र बुध्दिमत्तेला कर्तृत्वाची जोड असली की अवघड कार्यात यश मिळतेच. आपल्या कष्टाचं चीज होऊन आपली मनोकामना पूर्ण होणार आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व आर्थिक आवक अपेक्षित होईल. सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय करणार्‍यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन वास्तु खरेदी योग आहे. अचानक प्रवास योग येतील. अनेक प्रकारचे लाभ होतील. आनंद संयमानेच द्विगुणित करावा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. काळ सुखात जाईल.

संयम ठेवावा
सिंह ः

यश नजरेच्या टप्प्यात असले तरी ते केव्हा दूर जाईल, अशी आपली अवस्था आहे. आवकपेक्षा जावक जास्त होईल. अचानक खर्च उभे राहतील. घरगुती समस्या वाढवू देऊ नका. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाबाळांकडे नीट लक्ष पुरवणे गरजेचे आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी ग्रहराज रवि, धाडसी मंगळ व बुध्दीकारक बुध आपल्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. केतु महाराज तब्येतीला सांभाळण्याची सूचना देत आहेत. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. संत मंडळींचा सहवास लाभेल. शब्द जपून वापरणे योग्य होईल. काळ चढउताराचा राहील. व्यापारी वर्गाला अपेक्षित आर्थिक आवक होईल.

झाले मोकळे आकाश
कन्या ः

आपणाला शनि महाराजांच्या साडेसातीतून मोकळीक मिळाली आहे. तेव्हा आता मोकळा श्‍वास घ्यायला व प्रगतीच्या दिशेने जायला हरकत नाही. शनि व गुरु महाराज आपणावर खुश आहेत. तेव्हा येणार्‍या नवीन संधीचा लाभ घेणे उचित होईल. गुरुकृपेने नवीन योजना हाती घ्याल व यशस्वी व्हाल. मानसिक दौर्बल्य झटकून टाका. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नातेवाईक व मित्र यांचे सहकार्य उत्तम लाभेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. काळ सुखात जाईल.

सौख्य लाभेल
तुळ ः

या महात आपणावर राहू- केतूची कृपा झाल्याने आपणाला अनेक प्रकारची सुखे लाभून ऐश्‍वर्य प्राप्त होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा वाटा मिळेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. कवी, लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दीच्या झोतात येतील. गुरुकृपेमुळे अवघड कार्यात यश प्राप्त होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. भागीदारीत व्यवसाय करु नये. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

धनलाभ होईल
वृश्‍चिक ः

या महात आपणाला अचानक धनलाभ संभवतो. गुरुकृपेमुळे सौभाग्य सिध्दी प्राप्त होईल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून आपल्या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव होईल. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नवीन योजना फायदेशीर होतील. सामाजिक दर्जा उंचावेल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. मानसिक दडपण दूर करावे व पूर्ण आत्मविश्‍वासाने अवघड कार्यात यश संपादन करुन घ्यावे. सुशिक्षित बेकारांना नवीन नोकरीची संधी लाभेल. घरगुती वादविवाद टाळावेत. गैरसमज दूर होऊन शत्रू मित्र बनतील. नातेवाईकांचे सहकार्य उत्तम लाभेल.

दक्षता बाळगावी
धनु ः

आपण शनि महाराजांच्या अवकृपेच्या छायेत वावरत असल्याने प्रत्येक महत्वाच्या कामात अत्यंत गुप्तता राखावी. धाडसी मंगळ व ग्रहराज रवि आपणाला यश संपादन करुन देण्यास आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तूर्तास यश जवळ आलेले दिसले तरी घाई करु नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. कोर्ट- कचेरीची कामे तूर्तास लांबणीवर टाकावीत. घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. घरातील भाऊबंदक्या वाढवू नयेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. उपासनेवर भर देणे फार आवश्यक आहे.

सुख लाभतील
मकर ः

या महिन्यात आपल्या आर्थिक समस्या संपुष्टात येऊन आपण प्रगतीच्या लाटेवर आरुढ होणार आहात. नवीन वास्तू खरेदी योग येईल. अचानक धनलाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकीट काढून नशीब आजमावण्यास हरकत नाही. घरात उत्तम घटना घडतील. अचानक प्रवास योग येतील. मुलाबाळांशी जास्त वादविवाद घालू नयेत. नवीन जबाबदार्‍या स्वीकारु नयेत. स्वप्न दृष्टांत खरे होतील. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभून प्रसिध्दी मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. व्यापारात वृध्दी होईल. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील.

उत्तम काळ
कुंभ ः

आपली आचार, विचार व वृत्ती चांगली असल्याने आपल्याला अनेक बाबतीत यश संपादन करता येते. परोपकारी वृत्ती व दानी स्वभाव यामुळे समाजात आपण वर्चस्व राखून आहात. या महात खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. घरात उत्तम घटना घडतील. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. आर्थिक आवक वाढेल. स्वप्नदृष्टांत खरे होतील. सच्चाई व सबुरी यामुळे आपला प्रतिष्ठितांकडून गौरव होईल. मनोदौर्बल्य झटकून टाकून जबाबदारी स्वीकारावी. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.

धनलाभ होईल
मीन ः

अखेर जिद्द, कष्ट व चिकाटी यांना यश लाभतेच. आपले कर्तृत्व व धाडस यामुळे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. विवाहइच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. सुशिक्षित बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सुखात वाढ होणार आहे. धाडसाने पुढे जावे. नवीन आलेली संधी सोडू नये. अनाठायी खर्चावर नियंत्रण हवे. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. काळ सुखात जाईल. शब्द जपून वापरावेत. आनंद संयमाने द्विगुणित करावा हेच योग्य होईल.