Wednesday, Feb 21st

Headlines:

विनोद कूकवेअरचे नवीन लॉंच - सिसिली कॅस्सेरोल सेटस् आधुनिक शहरी किचन्सना परिपूर्णपणे शोभेल अशा व पारंपारिक कूकिंग स्टाइल्ससह ग्राहक अनुकूल डिझाइनची कूकवेयर बादशाहची नवीन रेंज सादर

E-mail Print PDF
cook-wares
पाहुण्यांना आकर्षित करण्याचा व स्वादिष्ट डिशेससह आल्हादित करण्याचा आनंद भारताच्या सर्वात प्ाुरातन किचनवेअर ब्रँड्सपैकी एक, विनोद कूकवेयर सह द्विगुणित झाला आहे. या ब्रँडने त्यांचा नकीन कॅस्सेरोल ब्रँड लॉंच केला आहे. सिसिली कॅस्सेरोल सेटस्‌ची रेंज कंपनीचा विश्‍वासार्ह अभियांत्रिकी वारशासह रचण्यात आली आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक डिझाइन व स्टाइलिश वैशिष्ट्ये दिसून येतात.    
दोन वस्तूंच्या एका सेटची किंमत १२९५/- रु. आणि तीन वस्तूंच्या एका सेटची किंमत २१२०/- रु. असण्यासह सिसिली कॅस्सेरोल सेटस् हे त्यांच्या विभागातील एक उत्कृष्ट व वाजकी दरातील सेटस् म्हणून बाजारात आले आहेत. इंडक्शन कूक-टॉप्स तसेच गॅस स्टोव्हजसाठी उपयुक्त अशा याच्या अद्वितीय इनवॅप्सुलेटेड इंडक्शन बेससह यांना आकर्षक रुपही देण्यात आले आहे. त्याची वैविध्यता, सुरक्षितता व अनुकूलता तुमच्या किचन व डायनिंग टेबलला एक सौंदर्यता प्रदान करण्याचे वचन देते.
सिसिली कॅस्सेरोल्समध्ये एक दीर्घकालीन मिरर-फिनिशिंग दिसून येते. टिकाऊ स्टेनलेस स्टीलची रचना आकर्षक दिसण्यासह कॅस्सेरोल्सचा फुगीर आकार हा आधुनिक शहरी किचन्ससाठी उपयुक्त अशा स्करुपात रचण्यात आला आहे. याच्या वाफेला बाहेर टाकणार्‍या छिद्रांसह असलेल्या काचेच्या झाकणामुळे जास्त उकळण्याच्या मुद्दयाचे निराकरण करता येईल, अशाप्रकारे याची रचण्यात करण्यात आलेली आहे. तसेच हे झाकण जेवण करतेवेळी अधिक दृश्यमानता प्रदान करते. कूकिंगनंतर, हे काचेचे झाकण वाफेला थंड होण्यास आणि अन्नावर पुन्हा संघनित होण्यास मदत करते, तसेच अन्नाला रसदारपणा प्राप्त करुन एक स्वादिष्ट चव प्रदान करते.   
कॅस्सेरोल्स हे इंडक्शन स्टोव्ह अनुकूल पण स्थानिक कूकिंग चुलींवर वापरता येण्याजोगे आहे. त्याची सुरक्षितता वैशिष्ट्ये जसे की, स्टेनलेस स्टील हँडल्स व ग्राहक अनुकूल डिझाइन उत्कृष्ट कच्च्या मालासह उपलब्ध आहेत, जे एक परिप्ाूर्ण कार्य व टिकाऊपणाची खात्री देतात.  
विनोद कूकवेयरच्या दर्जात्मक गुणांना प्रकट करणारा हा कॅस्सेरोल सेट खराब होत नाही. अन्नासोबत प्रतिक्रिया करत नाही किंवा गंजत नाही. हे कूकवेयर डिकॉशरसह सुरक्षितरित्या व सहजपणे स्वच्छ करता येतात.   
१६ सेमी, १८ सेमी व २० सेमी अशा आकारांत उपलब्ध असलेले सिसिली कॅस्सेरोल सेटस् एका वर्षाच्या गॅरंटीसह येतात. विनोद कूकवेयरच्या आकर्षक व ग्राहक अनुकूल किचनवेअर रेंजमध्ये हे कूकवेयर्स एक नवीनतम भर आहेत, जे पारंपारिक तसेच आधुनिक कूकिंगसाठी उपयुक्त म्हणून सिद्ध झालेले आहेत.  
किनोद कूकवेयर विषयी:
१९८६ मध्ये स्थापन झालेले विनोद कूकवयर हे कूकवेयर उद्योगातील ‘सँडविच बॉटम’ या संकल्पनेचे आद्य प्रणेते आहेत. सात वर्गवार्‍यांमध्ये ४०० हून अधिक उत्पादने देऊ करणार्‍या विनोद कूकवेयरच्या प्रेशर कूकरने अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
उत्पादनांच्या या श्रेणीत इंडक्शन कूकटॉप, नॉन-स्टीक कूकवेयर, हार्ड ऍनोडाईज्ड कूकवेयर आणि इतर अनेक अन्न शिजवण्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यात आला आहे.
भारतीय किचनला ध्यानात घेऊन, उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलने बनवण्यात आलेली विनोदची उत्पादने सर्व वयोगटातील गृहिणींना आपलीशी वाटतात. आपली उत्पादने बनवताना कंपनीने संशोधन आणि विकासावर दिलेल्या भरामुळे उत्पादनांना सोय आणि टिकाऊपण प्राप्त होते. ग्राहकाकडून मिळालेल्या अढळ विश्वासाची परिणती म्हणून या कंपनीने अनेक प्ाुरस्कार जिंकले आहेत. ‘बेस्ट एक्स्पो हाऊस’ हा त्यांनी जिंकलेल्या अतिशय प्रतिथयश पुरस्कारांपैकी एक आहे.
सध्या, अतिशय स्पर्धात्मक स्वरुप धारण केलेल्या भारतीय बाजारपेठेत ही कंपनी नेहमीच एक पाऊल पुढे असते. आपल्या तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करणारी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून त्यांनी अभिनेत्री ‘साक्षी तन्वर’ला नियुक्त केले आहे.
मीडियाविषयक अधिक माहितीकरिता संपर्क साधा:
रीमा चौरासिया  
फोनः ८६००५८९००६/ ९७६९९१४६३४
ई-मेल आयडीः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it '; document.write( '' ); document.write( addy_text53120 ); document.write( '<\/a>' ); //-->\n This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it