Tuesday, Jan 23rd

Headlines:

डॉ. शिवाजी मानकर यांचा होमियोपॅथीतील संशोधन प्रबंध लंडन विद्यापिठाकडून मंजूर

E-mail Print PDF
mankar-doctor
कोकणातील नामवंत होमियोपॅथी विशेषज्ञ डॉ. शिवाजीराव मानकर यांनी लंडन येथील हॅनेमन कॉलेज ऑफ होमिओपॅथी या विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रबंधाला मान्यता मिळाली असून सदर विद्यापीठाने त्यांना पदव्युत्तर पदवी बहाल केली आहे. यावर्षीच्या संपूर्ण बॅचमध्ये प्रथम क्रमांक संपादन करण्याचा विक्रम डॉ. मानकर यांनी केला आहे.
मधुमेह झालेल्या रूग्णांना होणारा अल्सर आणि गँगरीन हे असाध्य विकार असतात. पण डॉ. मानकर यांनी त्यावर प्रभावी उपाय होमियोपॅथीद्वारा केले आहेत. त्यामुळे सदर रूग्णांचा पाय कापण्याचे आणि त्यांना अपंगत्व येण्याचे संकट टळले. गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी किमान ४५ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचा पाय कापण्याचे संकट रोखण्यात यश संपादन केले आहे. हे यशस्वी उपचार त्यांनी केवळ शुद्ध होमियोपॅथीच्या आधारे केले. याबाबत त्यांनी संशोधन प्रबंध तयार करून हॅनेमन कॉलेज ऑफ लंडनला सादर केला. सदर प्रबंधाला संपूर्ण हॅनेमन विद्यापीठात सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून गौरविण्यात आले आहे.
तसेच या वर्षी भारतातून संशोधन प्रबंध सादर करणार्‍या सर्व संशोधकांमध्ये डॉ. मानकर यांना प्रथम क्रमांक लाभला आहे. सदर प्र्रबंध स्वीकारला जाण्यापूर्वी नामवंत तज्ञांनी त्यांच्याशी चर्चा करून डॉ. मानकर यांच्या संशोधनाची संपूर्ण सखोल माहिती घेतली आणि त्या संशोधनाचे चिकित्सक मूल्यमापन केले. त्यानंतरच त्यांच्या प्रबंधाला मान्यता देण्यात आली. या शोध प्रबंधासाठी डॉ. मानकर यांना सी.एम. पटेल होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई येथील प्रसिद्ध होमियोपॅथिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. प्रभाकर देवाडिगा यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. शिवाजी मानकर गेली सत्तावीस वर्षे चिपळण येथे शुद्ध होमियोपॅथी उपचार करीत आहेत. विशेषतः मधुमेह आणि त्यामुळे होणार्‍या गँगरीनवर त्यांनी अत्यंत प्रभावी उपचार पद्धतीचा यशस्वी वापर केला आहे. अनेक असाध्य शारिरीक आणि मानसिक आजारांवर त्यांनी यशस्वी होमियोपॅथी उपचार केले आहेत. आता विश्‍वविख्यात विद्यापीठाने त्यांच्या संशोधन प्रबंधाला मान्यता देऊन त्यांच्या ज्ञानाचा, अध्ययनाचा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण रूग्णसेवेचा गौरव केला आहे. चिपळूण येथे बाजारपेठेत स्वामी कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे क्लिनिक आहे. मधुमेह आणि अनेक असाध्य विकारांनी ग्र्रासलेल्या रूग्णांना त्यांचा फार मोठा आधार आहे.
रत्नागिरी येथेही डॉ. मानकर यांची सेवा उपलब्ध असून दर शनिवार, रविवार व मुंबई येथे सोमवार व मंगळवार, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर येथे रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध. संपर्क ः ९४२१९६०७८७, ९५५२२१११०४.