Sunday, Jan 21st

Headlines:

शिक्षक समिति शाखा खेडची कार्यकारीणी सभा उत्साहात संपन्न

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति शाखा खेड कार्यकारीणीची सभा तालुकाध्यक्ष   शिक्षक भवन येथे आयोजीत करण्यात आली होती.
अध्यक्ष अजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुरवातीला सरचिटणीस आनंद वळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व इतिवृत्त्त वाचन करुन ते कायम करण्यात आले. त्यानंतर तालुकाध्यक्ष अजित भोसले यांनी संघटनेची वाटचाल,संघटनेसमोरील आव्हाने,संघटनेची वाढत असलेली ताकद यांचे विस्तृतपणे स्पष्टीकरण करुन ज्या विचारांनी नविन सभासद समितिकडे आकर्षित होत आहेत त्यांचा विश्‍वास सार्थकी लावू असे स्पष्ट केले.
पतपेढीचे संचालक सुनिल सावंत यांनी शिक्षक पतपेढीच्या विविध योजनांची सखोलपणे माहीती दिली.तसेच या सभेत त्रैयवार्षिक अधिवेशना विषयी चर्चा करुन हे अधिवेशन २० एप्रिल२०१४ रोजी घेण्याचे ठरवण्यात आले.या झालेल्या चर्चेत जिल्हा कार्यालयीन चिटणीस पर्शुराम पेवेकर, शिक्षण समिति सदस्य सुनिल दळवी,जिल्हा प्रतिनिधी गोविंद यादव,संजय सुर्वे,सुनिल तांबे,तालुका उपाध्यक्ष विलास सकपाळ यांचा सहभाग होता.
यानंतर सभेमध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी,वरीष्ठ वेतनश्रेणी,शिक्षणसेवक फरक बिले,आर.टी.आय.कायदा,शालेय पोषण आहार,शालार्थ वेतन प्रणाली या विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेला सर्व सभासद बहुसं‘येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी या उपस्थितांचे सरचिटणीस आनंद वळवी यांनी आभार मानले व सभेची सांगता केली.