Sunday, Jan 21st

Headlines:

भरणे येथे शेतकरी माहीती व सल्ला केंंद्र

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी ) : शेतीची उत्पादकता व पवनव्यवस्था या दोन्ही बाबतीत अडचणी आहेत.देशाच्या आणि राज्याच्या सकल घरेलू उप्तादनातील वाढीचा दर सतत वाढत आहे.विकासाच्या या वाढत्या आलेखामुळे शहरातील ग‘ाहकांचे उत्पन्न ही वाढले असून , शेतमालाची मागणी ही वाढली आहे.ही मागणी उच्च मुल्यवर्धीत व गुणवत्त्ता पूर्ण शेतमालाची मालकी आहे.या बदललेल्या बाजाराची आव्हाने स्विकारण्यासाठी शेतकरी व बाजारव्यवस्था स्पर्धाक्षम करणे आवश्यक आहे.याकरिता शेतकर्‍यांसाठी कृषी विस्तार सेवांमध्ये सुधारणा आणि बाजार व्यवस्थेत सुधारणा करणे  या दोन्ही बाबी विचारात घेवून जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे.
कृषी विस्तार कार्यरत असलेल्या कृृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा या योजनेशी सलंग्न  व सहकार्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविला जातो. या दोन्ही योजनांचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना कृषी विस्तार सेवा मध्ये आम्याच्या माध्यमातून सुधारणा करणे, प्रशिक्षण , क्षमता वृद्धी आणि सुधारीत तंत्रज्ञान पोहोचविणे हे आहे.या उद्देशाने भरणे येथे शेतकरी माहिती व सल्ला केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत.सदर केंद्राचे उद्घाटन बबन भोसले (जिल्हा शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष)यांच्या हस्ते शेतकर्‍यांच्या उपस्थित करण्यात आले. या  केंद्रामध्ये शेतकर्‍यांना कृषी विषयक विविध योजनांची माहिती तसेच कृषी संलग्न विभाग जसे पशुसंवर्धन , मस्यसंवर्धन , सामाजिक वनीकरण व पणन  विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान याचे मार्गदर्शन त्यांच्या समस्यांवर सल्ला, उपाययोजना मिळणार आहे.
तालुक्यातील सर्व शेतकरी शेतकरी बंधूनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी प्रकल्प उपसंचालक श्री.माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. घोडके , रत्नागिरी येथील श्री. चव्हाण , पणन तंत्रज्ञ श्री. कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्री. काशिद ,चंद्रमणी रुके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सौ. अनुष्का मोहिते यांनी केले.