Sunday, Jan 21st

Headlines:

खोपी येथे ’कृषीपर्यटन’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खोपी येथे सम्राट अशोक स्वयंरोजगार सेवा उद्योग सहकारी संस्थेच्या वतीने ’कृषीपर्यटन’कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्ष कुणाल कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या या  उपक्रमांदरम्यान येथे आलेल्या पर्यटकांना परीसरातील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.
या कार्यशाळेला विविध भागातून पर्यटकांनी मोठया सं‘येने उपस्थित  होते. या कार्यशाळेत कृषी पर्यटनाबाबतची प्रात्यक्षिके सादर करुन  कृषी पर्यटनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित  पर्यटकांनी तालुक्यातील रघुवीर घाट,कुंभाड जंगल पर्यटन,खोपी शिरगाव धरण परीसर,बुध्द विहार,राम मंदिर,शंकर मंदिर व काळकाई मंदिर यांची सफर करण्याचा आनंद घेतला. कोकणच्या विकासाला चालना, कोकण व्हिजन २०-२०,  कोकणचा कॅलिफोर्निया या विषयांवर सखोलपणे चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेला लवेल कृषी विभाग मंडल अधिकारी वामन कदम, खेड कृषी व्यवस्थापिका सौ.अनुष्का मोहिते, खोपी कृषी विभागप्रमुख योगेश अत्रे, माजी संचालक अशोक कदम,मुंबई येथील समाजसेवक संतोष भोईर,यांच्यासह संस्था पदाधिकारी व पर्यटक मोठया सं‘येने उपस्थित होते.