Sunday, Jan 21st

Headlines:

खेड येथे २६ रोजी जिल्हास्तर नृत्य स्पर्धा

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजी मित्रमंडळातर्फे २६ ते २८ एप्रिल या कालावधीत विविधांगी कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले असून २६ रोजी रात्री ९ वाजता जिल्हास्तर नृत्य स्पर्धा होणार आहे.
नगरसेवक व मंडळाध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक मिलींद इवलेकर यांच्या माध्यमातून वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला व औषधोपचार केले जाणार आहेत. मिरज येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अजित मेहता, डॉ. स्वप्नील अडवलकर, डॉ. तन्म्य मेहता, डॉ.मगदूम यांचे सहकार्य लाभणार आहे.
२७ एप्रिल रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक‘म व २८ एप्रिल रोजी सत्यनारायणाची महापूजा याचबरोबर सायंकाळी ७ ते१० यावेळेत महाप्रसाद आदी कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे.