Sunday, Jan 21st

Headlines:

गुलामोहीद्दीन पालेकर कृषी विभागाच्या वतीने सन्मानित

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृृषी विभाग यांच्या मार्फत शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी बक्षीस योजने अंतर्गत मौजे शिव येथील गुलमोहीद्दीन पालेकर यांना नुकतेच बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पालेकर हे त्यांच्या प्रक्षेत्रावर वेगवेगळ्‌या कृषी व पशुसंवर्धन योजना यशस्वीपणे राबवित आहेत.त्यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावर आंबा, काजू, नारळ अशा विविध फळझाडांची लागवड करुन त्यापासून दरवर्षी ते भरघोस उत्पादन घेत आहेत. सतत कृृषी विभाग व दापोली विद्यापीठाशी संपर्कात राहून सुधारित तंत्रज्ञानाचा आपल्या प्रक्षेत्रावर अवलंब करीत आहेत.
शेती विषयक तसेच पशुसंवर्धन विषयक प्रत्येक योजना ते यशस्वीपणे राबवून त्यातून उत्पन्न घेत आहेत. नुकतेच फेब‘ुवारी महिन्यात नागपूर येथे झालेल्या जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या शेतीविषयक आस्थेमुळे व त्यांच्या शेतीमधून प्रत्येकवेळी नवनविन काही करण्याच्या दूर दृष्टीमुळे त्यांचा शेतकरी सल्ला समीती (आत्मा)च्या सभेमध्ये तालुका कृषी अधिकारी काशीद यांच्याकडून पुष्प देवून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बबन भोसले,रामचंद्र आखाडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी बहुसं‘येने उपस्थित होते.