Sunday, Jan 21st

Headlines:

गावरई येथे वाचनालय सुरु

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गावरई येथे दानशूर श्री.दत्ताराम रामाणे यांचे मार्फत वाचनालय सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावरई गावचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण कुटरेकर हे होते. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी गावरई गावचे सरपंच श्री. दिनेश जावळे,मुख्याध्यापक श्री.दिगंबर निखार्गे, शिक्षक  श्री.अनिल गोरिवले,सौ.गोरिवले, सौ.तडवी,  पोलिस पाटील श्री. पांडूरंग कुटरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महादेव माने, उपाध्यक्ष सौ.विजया पवार, सदस्य श्री.लक्ष्मण पवार, सौ. सीता आईनकर, सौ.संध्या खळे, सौ.अर्पिता कुटरेकर, श्री.संदीप जावळे, श्री.भिमराव तांबे, सौ.अनिषा तांबे, श्री.अमोल तांबे, श्री.मनोहर कुटरेकर, श्री.गंगाराम घडवले, श्री.भागोजी मांडरे, श्री.रावजी करबेले, श्री.बाबूराव जावळे, सौ.सुलोचना मांडरे, आदि मान्यवर उपस्थितीत होते.
श्री.रामाणे हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी वाचनालयाला ५ हजार रु.किंमतीचे कपाट व ५ हजार रु.किंमतीची विविध विषयांवरील पुस्तके भेट दिली.