Sunday, Jan 21st

Headlines:

उन्हाळी सुट्टीदरम्यान किलबिल कँम्पचे आयोजन

E-mail Print PDF
दापोली (शहर वार्ताहर)ः-दापोली शहरात उन्हाळी सुट्टीनिमित्त बच्चे कंपनीसाठी खास किलबिल कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला, संस्कारवर्ग व बौध्दिक खेळ असे या सुट्टीतील कँम्पचे स्वरुप ठेवण्यात आले आहे.
शहरातील दापोली शिक्षण संस्थेच्या चैतन्य सभागृहात हा वर्ग होणार आहे. १७ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत स.९ः३० ते दु.१२ः३० या वेळेत हे वर्ग घेण्यात येणार आहेत. शहर परिसरातील अनुश्री जोशी, प्राची बर्वे, लीना मंडलीक तीन महिलांनी एकत्र येऊन या खास वर्गाचे आयोजन केले आहे. १५ एप्रिल पर्यंत या वर्गासाठी इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची नावे दयावीत असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. प्रवेश शुल्क ३०० रु आकरण्यात येणार आहे. या कँम्पच्या अधिक माहितीसाठी ९४२२६३६२७३, ९७६५३१४९९०, ७८७५५४६७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.ेे