Sunday, Jan 21st

Headlines:

पांगारी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सभा

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी)  दाभीळ पांगारी पंचक्रोशीतील कॉग्रेस आयचे ज्येष्ठ  कार्यकर्ते श्री. अमिनभाई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉग्रेस कार्यकत्यार्ंंची सभा तालुका अध्यक्ष ऍड. श्री. विकास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या सभेला कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर दळवी, माजी तालुका अध्यक्ष श्री.बंडुकाका खोत, महमद अली दळवी, य्ाुवक अध्यक्ष अस्लम दळवी, सोनू कांब्रे, नझर बर्डे, राष्ट्रवादीचे श्री. विनायक पाष्टे, रामचंद्र येलवे, कॉग्रेसचे भोई समाजाचे नेते श्री. संतोष कांब्रे तसेच पांगारी व दाभीळ गावतील सर्व नागरिक उपस्थित होते.यानंतर पांगारी महाकाळवाडी येथेहि बैठक संपन्न झाली. भोई समाजाचे नेते श्री.प्रकाश वाटेकर, संतोष महाकाळ, महिला अध्यक्षा सौ.मनिषा महाकाळ, श्रीधर मींडे तसेच सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भोई समाजाच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा कॉग्रेसचे सरचिटणीस मधुकर दळवी यांनी समाधानकारक उत्तर दिल्याने सर्व ग्रामस्थ कॉग्रेस आघाडीच्या पाठीशी ठाम राहणार आहेत असा निर्धार यावेळी करण्यात आला.