Sunday, Feb 18th

Headlines:

जोशचे जेएम-२४०० - साऊंडची जादू तुमच्या पाकिटात

E-mail Print PDF
jm-2400-red
jm-2400-red-1
भारताची आपली इलेक्ट्रॉनिक कंपनी जोशने आपल्या नवीन जेएम-२४०० बार फोनला लॉन्च केले आहे. जोश मोबाईल शृंखलेमध्ये नवीन सादरीकरण - जेएम-२४०० आपल्या ३ डी यूजर इंटरफेस व प्रभावशाली स्पीकर्सच्या माध्यमातून यूजर्सना उत्साहित करण्याकरिता उत्सुक आहे. हे इंटरफेस यूजर्सना लाईव्ह वॉलपेपर्स इन्स्टॉल करण्यामध्ये सक्षम बनविते. त्याचबरोबर, याचे आवाजाची विशिष्ट जादू पसरविणारे प्रभावशाली स्पीकर्स यूजर अनुभवाला समृद्ध बनवतील.
ड्यूएल सिम, ड्यूएल बँड सपोर्टिंग डिव्हाईस- जेएम२४०० चे सादरीकरण २.४ इंचाच्या रंगीत डिस्प्लेसह करण्यात आले आहे, जे स्क्रीनवर कन्टेन्टला स्पष्ट व विस्तारित स्वरुपात दाखवितात. याचे ३डी यूजर इंटरफेस लाईव्ह वॉलपेपर्सच्या रिलेला सपोर्ट करते आणि अशाप्रकारे स्थिर व्हिज्युअल्समध्ये जिवंतपणा येतो, जो यूजर्सच्या दर्शन अनुभवाला प्रगत बनविते. वापरकर्त्यांना आनंद प्रदान करण्याकरिता जेएम २४००ला पॉवर पॅक्ड स्पीकर्सने समर्थन प्रदान करण्यात आले आहे, जे विशिष्ट जादूई आवाज निर्माण करुन नवीन वातावरण निर्माण करतात.
फोन आपल्या डिजिटल कॅमेरा वैशिष्ट्याने तुम्हाला आकर्षित करेल, जो तुम्हाला आपले संस्मरणीय क्षण फोटोंमध्ये बंदिस्त करण्याचे आणि पिक्चर परफेक्ट शॉटस् सह रेकॉर्ड करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो. यामध्ये एक व्हिडिओ प्लेयर देखील आहे, जो तुम्हाला आठवणी साठविण्यामध्ये सक्षम बनवितो. याचा ८जीबी विस्तार करण्यायोग्य मेमरी कार्ड सपोर्ट तुम्हाला बर्‍याच म्युझिक फाईल्स, फोटो व व्हिडिओज स्टोअर करण्यामध्ये सक्षम बनवितो, ज्याला फोनवर ‘ब्लूटूथ’च्या सिंगल क्लिकद्वारे सहजतेने ट्रान्सफर केले जाऊ शकते. यामध्ये २४०० एमएएच पॉवरफूल बॅटरी आहे, जी तुमच्या मनोरंजनाला मोठ्या कालावधीपर्यंत आणि मोठ्या आवाजामध्ये कायम ठेवण्याला सुनिश्‍चित करते. यामुळे तुम्हाला एकदा चार्ज केल्यावर ६०० मिनीटांचा टॉक टाईम आणि ३५० तासांपर्यंतचा स्टँडबाय प्राप्त होतो. वापरकर्त्याच्या सोयीकरिता यामध्ये एक इन-बिल्ट टॉर्च देखील आहे, ज्याचा वापर निकडीच्या प्रसंगी केला जाऊ शकतो.
जेएम २४०० आपल्या बिल्ट इन एफएम सह तुमच्या मनोरंजनाला अमर्यादित करतो, जो तुम्हाला आपल्या पसंतीचे संगीत स्ट्रीम करण्याचे स्वातंत्र्य देते. टेक सेव्हीच्या आवश्यकता ध्यानात घेता फोनमध्ये बिल्ट इन जीपीआरएस सपोर्ट देखील उपलब्ध आहे, जो यूजर्सना प्रत्येक वेळी संपर्कात राहण्याकरिता सक्षम करतो. यूजर्सना प्रेफरन्स करिता यामध्ये दुहेरी भाषा सपोर्ट देखील उपलब्ध आहे, जो यूजर्सना प्रत्येक वेळी संपर्कामध्ये राहण्यामध्ये सक्षम बनवितो. यूजर प्रेफरन्स करिता यामध्ये दुहेरी भाषा सपोर्ट - हिंदी व इंग्रजी सादर करण्यात आला आहे.
पाकिटात राहणारा पॉवरफूल परफॉर्मर जेएम२४०० काळ्या, सिल्व्हर व लाल रंगामध्ये उपलब्ध आहे आणि याची किंमत केवळ १,४९९/- रुपये आहे.
जोश मोबाईल्स विषयी:
चौकटीत न राहता परवडण्याजोगे तंत्रज्ञान पुरवण्याच्या एकमेव ध्येयाशी प्रामाणिक राहणार्‍या जोश मोबाईल्सची स्थापना २०१० मध्ये झाली. यांच्या फोन्सची श्रेणी अनेक शाखांमध्ये उपलब्ध आहे. यांच्या उत्पादनांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशीलतेसह व्यावसायिकता आणि मनोरंजन यांचा उत्तम मेळ घातला गेला आहे. जोशच्या स्मार्ट फोन्समध्ये निर्दोष डिझाईन आणि शक्तीशाली वैशिष्टयांसोबत परवडण्याजोग्या किंमतींचा मेळ घालण्यात आला आहे. ‘हर बात जोश से’ या आपल्या सूत्राशी एकनिष्ठ राहत ही एतद्देशीय कंपनी सातत्यपूर्ण रितीने वाढणार्‍या भारतीय मोबाईल फोन बाजारपेठेत नवे कल प्रस्थापित करण्यास सज्ज झाली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
रीमा चौरसिया
फोनः ८०८७८४३२५६
ई-मेलः This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it '; document.write( '' ); document.write( addy_text67264 ); document.write( '<\/a>' ); //-->\n This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it